गावी जातो असे सांगून घराबाहेर पडलेला इसम बेपत्ता
पनवेल दि २०, (संजय कदम): मूळ गावी जातो असे सांगून घरा बाहेर पडलेला एक इसम अद्याप घरी न पोहचल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
संदेश धोंडीराम कांबळे (वय ३७)रा. बालाजी अपार्टमेंट, परदेशी आळी पनवेल उंची ५फूट,रंग सावळा, चेहरा गोल, बांधा मजबूत, केस बारीक, नाक बसके असून अंगात लाल रंगाचा शर्ट व निळसर रंगाची पॅन्ट घातलेली आहे सोबत मोबाईल फोन आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किवा पोहवा संदीप फाळके यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो- संदेश कांबळे