महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी दिनेश वांद्रे पाटील यांची निवड
खोपोली / प्रतिनिधी – शीतल पाटील
महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी खालापूर तालुक्यातील चिंचवली(गोहे) येथील पोलिस पाटील दिनेश वांद्रे पाटील यांची निवड नुकताच झाली असून विधानपरिषदेचे आम.अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.तर पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होताच तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलिस पाटीलांच्या समस्या शासनदरबारी पोहचविण्यासाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघाच्या नवी कार्यकारणी आणि पदग्रहण सोहळा माणगांव येथे विधानपरिषदेचे आम.अनिकेत तटकरे यांच्या उपस्थित संपन्न झाला.नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षपदी अध्यक्ष संतोष दळवी ( सुतारवाडी- रोहा)
कार्याध्यक्ष चंद्रकांत चेरफळे (दहीवली माणगाव) संघटक गणेश ढेणे (वरवणे पेण ) सरचिटणीस विकास पाटील चेंढरे ( अलिबाग)यांची निवड करण्यात आली आहे तर पाच वर्षापासून खालापूर तालुक्यातील चिंचवली (गोहे) येथे पोलिस पाटील पदावर कार्यरत असणारे कोरोना काळात सामाजिक कार्यकरणारे दिनेश वांद्रे पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.पाटील यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. माणगाव येथील मेळावा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती व राज्य सचिव कमलाकर मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडला. पाच वर्ष जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून पोलीस पाटलांच्या समस्या निवारण व न्याय मागण्यासाठी सतत प्रयत्न केले त्याची दखल घेऊन संघाने जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिनेश वांद्रे पाटील यांना दिली.
चौकट-
पोलिस पाटीलांच्या समस्या निवारण करण्यासाठी व न्याय हाक्काच्या मागण्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न करून पदाला साजेस अस काम करून संघटन मजबूत काम करणार आहे.तसेच आ.अनिकेतभाई तटकरे यांनी रोख ५१ हजार रूपये दिले. तसेच पोलिस पाटील भवनासाठी १० लाख रूपये उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा कार्यकारिणी च्या वतीने अभार
– दिनेश वांद्रे पाटील
नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघ
फोटो व कँप्शन