सरपंच जीवन गावंड यांच्या वाढदिवसानिमित्त कचरा कुंडीचे वाटप.
उरण दि 22 :उरण तालुक्यातील वशेणी ग्रामपंचायतचे सरपंच जिवन गावंड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 15 वा वित्त आयोग आरोग्य व स्वच्छता अभियान अंतर्गत वशेणी ग्रामपंचायत कडून वशेणी गावातील प्रत्येक घरात कचराकुंडीचे वाटप करण्यात आले.यावेळी जीवन रोहिदास गावंड सरपंच वशेणी,ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड, गणपत ठाकूर, कृष्णा ठाकूर, शोभा पाटिल, सोनिया म्हात्रे, संगिता ठाकूर, सुप्रिया तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.घराघरात कचरा कुंडीचे वाटप करण्यात आल्याने गाव व गावच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार आहे.सरपंच जीवन गावंड यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी,नातेवाईक, मित्र परिवारातील मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.