खारघर मधील सेलिब्रेशन सोसायटी परिसरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला
पनवेल दि.२४: खारघर मधील सेलिब्रेशन सोसायटी परिसरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. तर कुत्र्यांनी काही व्यक्तीला चावा घेतल्याने राहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन खारघर सेलिब्रेशन केएच चार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिले.
खारघर, सेक्टर-१७ मधील सेलिब्रेशन केएच चार सोसायटीत १९ इमारती असून ५३२ सदनिका आहेत. त्यामुळे परिसरात नागरिकांची वर्दळ असते. त्यात सदर इमारत परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. आकाश गुप्ता नामक रहिवाशी मोटार सायकलने जात असताना मागून आलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने मोटारसायकल वरुन पडून गंभीर त्याला दुखापत झाली आहे. आता या मोकाट कुत्र्यांनी वसाहतीतील पाच मुलांना चावा घेतला आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दूध, पेपर विक्रेते येणास मनाई करतात. मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्यामुळे आणि दुचाकी, चार चाकी वाहन चालकांच्या मागे लागत असल्यामुळे आणि परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्यामुळे राहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीचे निवेदन सेलिब्रेशन केएच चार सोसायटीचे पदाधिकारी दौलत काटकर, डॉ.विजय चव्हाण, लीना राफेल, केतकी टेंम्बरे, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले आकाश गुप्ता, सामाजिक कार्यकर्त्या रेणुका रेणुका पगारे, मुनावर देशमुख, महेश राऊत, चंद्रकांत चंदनशिवे, हर्षल गायकवाड, आदि पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना दिले आहे.
फोटो : आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देताना सेलिब्रेशन सोसायटीचे पदाधिकारी