सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती मिळाल्याने सतीश शिदोरे यांनी केले अनाथ मुलांना अन्नदान
पनवेल /प्रतिनिधी :
पोलीस हवालदार सतीश हनुमंतराव शिदोरे यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाल्याने सहकारी व कुटूंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रामाणिक पणे केलेल्या कामामुळे त्यांचे प्रमोशन झाले. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वडिलांचे प्रमोशन झाल्याने त्यांचा मुलगा प्रदिप व महेश यांच्या हस्ते पनवेल येथील लहान मुलांच्या बालग्राम आश्रमास अन्नधान्य वाटप केले.यावेळी बालग्राम संस्थाचालक विनायक पाटील सह कुटूंबातील सदस्य उपस्थिती होते