कळंबोली येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर वृक्षारोपण
खेळासोबत वृक्षारोपण विजय खानावकर यांनी पाडला नवा पायंडा
क्रिकेट खेळणार्यां मुलांनी केले वृक्षारोपण.
पनवेल ता.26(वार्ताहर) निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन नगरसेवक विजय खानावकर यांनी ता. 26 रोजी वृक्षारोपण करताना केले.
कळंबोली मधील सेक्टर-1 के.एल.ई कॉलेजच्या बाजूच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर क्रिकेट व ईतर मैदानी खेळ खेळले जातात कळंबोली मधील क्रिकेट सामन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मैदानावर कोविड नंतर प्रथमच पावसाळी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने क्रिकेट प्रेमी व खेळाडू तसेच कळंबोली मधील नागरिकांनी या मैदानाच्या चहुबाजुला वृक्षारोपण केले. या ठिकाणी शोभेची झाडे न लावता मोठी सावली देणारी झाडे विजय खानावकर यांच्या मार्फत लावण्यात आली आहेत. या मैदानावर वर्षभर काही ना काही खेळ खेळले जातात. मैदानाच्या चोहोबाजुंनी झाडे लावली असल्याने आता सामना पाहण्यासाठी मंडप टाकावा लागणार नाही. या पुर्वी क्रिकेट खेळताना प्रेक्षकांना सावली मिळावी या हेतूने जागोजागी मंडप बांधावे लागत होते परंतु हि झाडे व्यवस्थित जगवली तर मैदानाच्या कडेने सावली भेटेल व प्रेक्षक झाडाच्या सावलीत बसून खेळाचा आनंद लुटू शकतात. लागलेल्या झाडांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पडू नये म्हणून या ठिकाणी ठिंबक सिंचन करून जगवली जाणार असल्याचे आयोजक हणमंत चौधर यांनी सांगितले.
या वेळी पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी चे नेते सुदाम पाटील, सुधागड हायस्कूल चे प्राचार्य राजेंद्र पालवे सर, महादेव पाटील, अजय सुर्यवंशी, तुकाराम सरक, श्रीकांत फाळके, महेश गोडसे , निलेश दिसले, अजय सुर्यवंशी यांच्यासह क्रिकेट खेळाडू व शेकडो कळंबोलीकर नागरिक उपस्थित हो एमते.