रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरणारा पोलिसांच्या ताब्यात
पनवेल दि. २७ : कामोठे येथील एका इसमाचा मोबाईल चोरणाऱ्या सराईत मोबाईल चोरट्यास फलाटावरील प्रवाशांनी पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .
कामोठे येथे राहणाऱ्या स्वप्नील जाधव यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. तो नेरुळ येथे बहिणीकडे आला असता तिथून रेल्वेने मुंबईला चालला होता. यावेळी तो नेरुळ स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये दरवाजात उभा होता. लोकल सुरु होताच एका तरुणाने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. यावेळी जाधव याने आरडा-ओरडा करताच नागरिकांनी चोरट्याला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याचे इम्रान मोहम्मद आझाद शेरानी (२८) असे असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.