शिवसेना पुरस्कृत शिवराज शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध दाखल्यांचे वाटप
पनवेल दि.३० : शिवसेना पुरस्कृत शिवराज शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था व तहसिल पनवेल महाराजस्व अभियान कार्यक्रमाअंतर्गत विविध दाखले, रेशनकार्ड, आधारकार्ड, संगायो योजना लाभ शिबीर, विविध दाखल्यांचे वाटप पनवेल तालुक्यातील पालेबुद्रुक येथील संजय गांधी स्मारक हायस्कुल येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन संजय गांधी स्मारक हायस्कुलचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हासंघटक परेश पाटील, कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष विश्वास पेटकर, संस्थेचे कार्याध्यक्ष पांडुरंग भोईर, खजिनदार विष्णू जोशी, चेअरमन भाऊशेठ भोईर, संचालक प्रकाश म्हात्रे, जनार्दन भोईर, सदस्य हेमराज म्हात्रे, पालीबुद्रुक सरपंच राजेश भोईर, उपसरपंच रोहिणी भोईर, सदस्य दिलीप पाटील व प्राचार्य डि. डि. कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख व स्व. दि बा पाटील प्रकल्पगस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी या शिबिरास भेट दिली असता आयोजकांच्या वतीने नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील साहेब याचे नाव दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बडे, उपतालुका प्रमुख शांताराम कुंभारकर, विभागप्रमूख प्रमोद पाटील, दत्ता फड़के, समाजसेवक संदीप तांडेल, शहर संघटिका ज्योती मोहिते, विभाग संघटिका नीलिमा पाटील, शाखाप्रमुख जगन्नाथ म्हात्रे, उपविभागप्रमुख विष्णू भोईर, हिरामण भोईर, शाखाप्रमुख प्रवीण पाटील, काशिनाथ पाटील, या कार्यक्रमास शासकीय मदत करणारे तलाठीसजा पालेबुद्रुक आर.एन.मांढरे, रमेश यानबुरे, सेतू कर्मचारी प्रवीण सातव, निखिल घाटे, आधार केंद्र संचालक संचित मुकादम यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव राज दरे, सदस्य मिनाज भोईर, खजिनदार प्रदीप पाटील, सहसचिव योगेश भोईर, सहखजिनदार विकास पेटकर, सदस्य राहुल पाटील, ओंकार पाटील, विकी म्हात्रे, भागेश गडगे, जयदीप उबाळे, रवी पेटकर, विराज पेटकर, सचिन पाटील, गोविंद गडगे यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो : शिवराज शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे माध्यमातून सत्कार व विविध दाखले वाटप