स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीने विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री, सर्वपक्षीय कृती समितीचे मानले जाहीर आभार
पनवेल दि.३० : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री, सर्वपक्षीय कृती समितीचे जाहीर आधार मानले आहे.
सिडको प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे आधारस्तंभ लोकनेते दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावे म्हणून अनेक आंदोलने करण्यात आली. आर पी आय आठवले गटाचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदिश गायकवाड यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना तडीपारीची काही दिवसाची सजा भोगावी लागली. माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून आंदोलने केली. सर्वपक्षीय कृती समीती मध्ये शिवसेनेचे बबन पाटील, काँग्रेसचे महेन्द्र घरत, आर. सी. घरत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर, भाजप आमदार महेश बालदी, नवी मुंबईचे लोकनेते गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, शेकापचे आमदार बाळाराम पाटील जे एम म्हात्रे, काशीनाथ पाटील, राजेन्द्र पाटील असे अनेक मान्यवरांनी विमानाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी हजारों भूमीपुत्रांना एकत्र घेउन अनेक वेळा मोर्चे काढले. या सर्वांची दखल घेउन व लोकभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मिटींगमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव ठराव पारित केल्याबद्दल स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीने मुख्यमंत्री व सर्वपक्षीय कृती समीतीचे जाहारी आभार मानले आहे.
फोटो : महेश साळुंखे