कृषी संजीवनी कार्यक्रम व PMFMF मार्गदर्शन उरण येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड यांच्या उपस्थितीत संपन्न.
उरण . नुकतेच ३० जून २०२२रोजी मोजे चिरनेर व मौजे बेलोंडेखार येथे कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतीपूरक व्यवसाय या विषयी शेतकरी, व महिला बचत गट यांना मा. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड श्रीमती बाणखेले मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परसबाग बियाणे वाटप करण्यात आले. तसेच pmfme अंतर्गत कृषी प्रक्रिया युनिट ला भेट देण्यात आली, महिला बचत गटाशी संवाद साधताना महिला गटांनी जास्तीत जास्त pmfme अंतर्गत नोंदणी करून अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये सहभागी होण्याचे आव्हान श्रीमती बाणखेले मॅडम यांनी महिलांना केले. यावेळी मा.श्री. काळभोर साहेब उपसंचालक अलिबाग, तालुका कृषी अधिकारी श्री. ढवळ साहेब, मंडळ कृषी अधिकारी लोहकरे साहेब, तसेच कृषी सहाय्यक निखिल देशमुख, सुरज जाधव व विभावरी चव्हाण उपस्थित होते.