स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात
पनवेल दि.०१ :कळंबोली व रोडपाली येथील रस्त्यावर पडलेले खड्डे व बऱ्याच ठिकाणी रस्त्याची खूप दुर्दशा झाली आहे. यासंदर्भात स्त्री शक्ती फौंडेशन च्या वतीने सिडको व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. या मागणीची दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
स्त्री शक्ती फौंडेशन अध्यक्ष सौ विजया चंद्रकांत कदम यांच्या पुढाकाराने शैलेश कुमार मिश्रा, चिमाजी मेंगडे, सुभाष सारतापे, बालकृष्ण म्हात्रे, अक्षय म्हात्रे, ज्ञानोबा पंडित, दत्तात्रय मोरे आदींनी सिडको चे अधिकारी मोहिले, बनकर व चिखलकर व पालिकेचे संजय जगताप यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले होते. यात त्यांनी म्हटले आहे कि, सेक्टर 1 सुधागड स्कुल रिक्षा नाका, सेक्टर २ई पोलिस ठाण्याजवळील रिक्षा नाका, रोडपाली बस डेपो जवळील रिक्षा नाका व डी मार्ट जवळील रिक्षा नाका अश्या सर्व नाक्यावरील रिक्षा चालक यांनी माझ्या कडे तक्रारी केल्या होत्या. रोज त्यांना पोटा पाण्यासाठी रिक्षा चालवावी लागते पण रस्त्यामुळे त्यांना रोज त्रास सहन करावा लागत आहे त्यांच्या कमाई तले अर्धे पैसे आठवड्यात मेन्टेन्स साठीच घालवावे लागतात आणि आपल्या सर्वांना ही तोच त्रास सहन करावा लागतो शिवाय दुचाकी वाले या खड्ड्यात ही पडलेत असे अपघात होत असेल तर याला जबाबदार कोण? यासाठी स्त्री शक्ती फौंडेशन च्या वतीने सिडको आणि महापालिकेला निवेदन देण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरच बुजवून देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने स्त्री शक्ती फौंडेशन अध्यक्ष विजया कदम यांनी त्यांचे आभार मानले आहे.
फोटो : स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात