खोपोली नगरपालिकेकडून बाजारपेठेत प्लास्टिक बंदीची जनजागृती,
खोपोली/ प्रतिनिधी
केंद्र शासनाने 100 मायोक्रोच्या कमी प्लास्टिक पिशव्यांवर 1 जुलै पासून बंदी घातली आहे. चोरटया मार्गाने या पिशव्यांचा वापर करू नये यासाठी खोपोली नगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने दि.2 जुलै रोजी बाजारपेठतील सर्व दुकांणदारांना भेटून जनजागृती करीत समज दिली आहे.दुसरया फेरीला प्लास्टिक दुकानात सापडल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
खोपोली नगरपालिकेने प्लास्टिक बंदी शहरात राबवून त्याची अंमलबजावणी सुरू जनजागृती अभियान मोहिम मुख्याधिकारी,प्रशासक अनुप दुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे.पालिकेचे आरोग्य सहाय्यक वैभव ओव्हाळ,राहुल महाडीक,राजेश मोते,गुणाजी गायकवाड, नितीन ढोळे,रोहिदास कांबळे,अक्षय वाणी,विशाल गोयल या पथकाने बाजारपेठेतील दुकाणंदारांमध्ये जनजागृती केली आहे.