मुसळधार पावसाने पनवेलकरांना झोडपले
पनवेल दि. ०५
गेल्या २४ तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेल परिसरात चांगले झोडपून काढले आहे. नेहमी प्रमाणे परिसरातील अनेक भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या .
सकळ भागात पाणी साचले असंल्याने दुचाकीसह चार चाकी वाहने बंद पडल्याच्या घटना सामोरे आल्या आहेत, पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता या पावसाचा आनंद बच्चे कंपनीने भिजून घेतला . पनवेल शहरासह कामोठे, पळस्पे ,कळंबोली , खारघर , करंजाडे,खांदा वसाहत आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहन चालकाचे चांगलेच हाल झाले होते . तसेच मानसरोवर रेल्वे स्थानकात सुद्धा पाणी तुंबल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत . पनवेल परिसरात अनेक ठिकाणी विकास कामे सुरु असल्याने व त्यातच खोद कामे सुरु असल्याने ग्रामीण भागात सुद्धा पाणी तुंबल्याचे प्रकार वाढले होते . नव्याने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमान तळाच्या कामामुळे त्या परिसरात असलेल्या पारगाव, डुंगी गाव मध्ये सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात साठले होते . साधारण पणे आता पर्यत १७२. २० मि. मि सरासरी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे . या पावसाळा सामोरे जाण्यासाठी पनवेल महानगरपालिका मार्फत व तहसीलदार कार्यालय यांच्या तर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्ष ची स्थापना करण्यात आली असून ०२२-२७४५२३९९, भ्रमणध्वनी – ८३६९८९९९०२ येथे सपंर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
फोटो – पनवेल परिसरात साचलेले पाणी