*स्कूल व्हॅन ने घेतला अचानक पेट*
पनवेल दि . ०५ :
गाडी मध्ये सी एन जी गॅस भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर पडून काही अंतर पुढे गेलेल्या स्कूल व्हॅन ने अचानकपणे पेट घेतल्याने परिसरात धावपळ उडाली . सदर घटना आज दुपारी घडली आहे . नवीन पनवेल उड्डाण पुला खाली असलेल्या कांडपिळे सी एन जी पंपामध्ये आज दुपारी पाऊणे तीन च्या सुमारास स्कूल व्हॅन क्रमांक एम एच ४६ जे ०३०१ ही गाडी घेऊन चालक गॅस भरण्यासाठी गेला व त्या नंतर सदर गाडी बाहेर काढून चालक थोडा पुढे गेला असता अचानक पणे गाडी ने पेट घेतला या वेळी परिसरातील नागरिकांनी सदर ठिकाणी धाव घेऊन आग्निशमक दलाला घटना स्थळी प्राचारण केले व त्यांनी आग आटोक्यात आणली. या लागलेल्या आगी मध्ये गाडी चे मोठे नुकसान झाले आहे. आग कशा मुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे . फोटो – स्कूल व्हॅन ला आग