एकतावादी रिपब्लिकन पार्टी युवक चे राष्ट्रीय अध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे यांचे महेश साळुंखे यांनी पनवेल नगरीत केले स्वागत
पनवेल दि.०६ : एकतावादी रिपब्लिकन पार्टी युवक चे राष्ट्रीय अध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे यांनी पनवेल येथील शासकीय विश्रामगृहाला भेट दिली त्यावेळी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी भेट घेऊन त्यांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले. त्याचप्रमाणे आगामी महानगरपालीका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व आंबेडकरी चळवळीतील गटांना एकत्र करून निवडणुका लढविण्याच्या मुद्दयावर चर्चा केली. त्याचप्रमाणे पनवेल येथील प्रसिद्ध हरी ओम कट्टा या हॉटेलचे मालक प्रशांत करपे यांनी सुद्धा भय्यासाहेब इंदिसे व त्यांचे कार्यकते याचे स्वागत केले.
आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्याशी महेश साळुंखे यांचे सलोख्याचे संबंध असल्यामुळे प्रत्येक नेत्याचे महेश साळुंखे हे पनवेल मध्ये आल्यावर स्वागत करतात व आंबेडकरी चळवळ कशी वाढविता येईल यावर सविस्तर चर्चा करत असतात. आगामी महानगरपालीका, जिल्हा परीषद, पंचायत समित्या, नगरपरीषद, नगर पंचायत या सर्व निवडणूकांमध्ये सर्व आंबेडकरी चळवळीतील गटांना एकत्र करून निवडणुका लढविण्याचा मानस महेश साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.