प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवकत्ते यांनी जपली सामाजिक बांधिलकी….
पनवेल /प्रतिनिधी :
तालुक्यातील कमठाला येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका सहकोषाध्यक्ष मारोती देवकते यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते सातवी च्या सर्व विद्यार्थांना एक वही व एक पेन अशी भेट देऊन सर्व विद्यार्थ्यां पुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका कोषाध्यक्ष मारोती देवकते यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन अशी भेट दिली. कमठाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक अंकुश राऊत यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमा बद्दल माहिती सांगताना म्हणाले की, काही पुढारी व नेते आपला वाढदिवस साजरा करताना अनावश्यक ठिकाणी खर्च करतात, बॅनरबाजी करुन खर्च करतात पण अशा शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक साहित्य वाटप करुन वाढदिवस साजरा करतांना दिसत नाहीत, तसेच लोकं मंदिर-मस्जिद या ठिकाणी दान – -धर्म करतात पण जे खरे विद्येचे मंदिर हे शाळा आहे इथे कुणीच लक्ष देत नाही पण पत्रकार मारोती देवकते यांनी त्यांचा वाढदिवस हा शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करुन केला हा उपक्रम खुपचं स्तुत्य आहे. असा उपक्रम करुन मारोतीनी सर्व विद्यार्थ्यांपुढे, राजकीय नेत्यांपुढे एक चांगलाच आदर्श ठेवला आहे असे अंकुश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे शरद सखाराम कुरुंदकर, प्रितम विठ्ठलराव पाटील, धनरेखा नागोराव सांगवीकर, अंकुश उत्तमराव राऊत, शिक्षकवृंद, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके (तालुका सचिव) नसीर तगाले, ( तालुका कार्याध्यक्ष) सय्यद नदीम,( तालुका उपाध्यक्ष) राजेश पाटील, ( तालुका उपाध्यक्ष)शेख अतीफ, (तालुका सरचिटणीस) गौतम कांबळे, ( तालुका कोषाध्यक्ष)रेहान खान, ( ता. सह सचिव) प्रणय कोवे, ( तालुका प्रसिद्धी प्रमुख) गंगाधर कदम (तालुका संघटक) राज माहुरकर, ( ता. संघटक) अरविंद सुर्यवंशी, ( ता. संघटक) प्रज्वल कारले, ( ता.सह संघटक) अक्रम चव्हाण, (ता.सह संघटक) परमेश्वर पेशवे, ( ता.सह संघटक) इंद्रपाल कांबळे, रमेश परचाके ( सदस्य), शेख सईद (सदस्य), विकास वाघमारे( सदस्य), गणेश यमजलवाड ( सदस्य),विनोद कांबळे ( सदस्य) आदी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.