आजादी का अमृत महोत्सव आणि शहीद जवानांच्या परीवारांचा सन्मान : वाई किसन वीर महाविद्यालयाचा उपक्रम
वाई (सातारा)
सातारा जिल्ह्यातील वाई मध्ये किसनवीर महाविद्यालय आणि एन.एन.सी. युनिट तर्फे २२ महाराष्ट्र एन.एन.सी. बटालियन, सातारा आयोजित आजादी का अमृत महोत्सव आणि शहीद जवानांच्या परिवारांचा सन्मान हा उपक्रम राबवण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी कर्नल मोहन भालशिंग २२ महाराष्ट्र एन.एन.सी. बटालियन सातारा अडमिनीस्ट्रेटीव ऑफिसर आणि जनता शिक्षण संस्था वाई सचिव जयंतराव चौधरी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली होती तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मदनदादा भोसले यांनी भूषविले होते. प्रमुख अतिथी म्हणून २२ महाराष्ट्र एन.एन.सी. बटालियन सातारा कमांडींग ऑफिसर कर्नल दीपक ठोंगे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे किसनवीर महाविद्यालयातर्फे निमंत्रक एन.एन.सी.अधिकारी लेफ्टनंट समीर पवार आणि कार्यवाह प्राचार्य गुरुनाथ फगरे यांनी काम पाहिले.