उरण नवघर येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली
उरण /प्रतिनिधी
मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथे रविवार दिनांक १०/०७/२०२२ रोजी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न झाली सकाळी ठिक ६-०० वाजता कै.पुरूषोत्तम रामदास तांडेल यांचे जेष्ठ चिरंजिव मा.श्री.विजय पुरूषोत्तम तांडेल सहपत्नी यांच्या शुभहस्ते श्री हनुमान मंदिरातील असणा-या शंकराची पिंड,श्री गणपती,मारूती,श्री राम सीता,लक्ष्मण,श्री कृष्ण,श्री विठ्ठल-रूखमाई देवतांना मंगळ स्नान करून अभिषेक करून सकाळपासूनच नवघर आणि परिसरातील भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले यावेळी भाविक महिला भगिनींची संख्या लक्षणीय होती तसेच सायंकाळी ठिक ६-०० वाजता उरण तालुका दैनिक बाळकडू आणि ग्रामस्थ मंडळ नवघर यांच्या सयुक्त विध्यमाने आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या आई एकविरा सांस्कृतीक कला मंच भेंडखळ आणि स्व.प.विश्वनाथ बुवा पाटील संगीत विद्यालय दिघोडे यांचा सुरेख सुमधुर अभंगवाणी,भावगीते व भक्तीगीतांचा कार्यक्रम मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला यावेळी उपस्थित कलामचाच्या गीतकारांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे नवघर जेष्ठ नागरिक सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुरेश तांडेल यांनी आभार मानले तर नवघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री.जयप्रकाश नारायण पाटील, नवघरचे सामाजिक कार्यकर्ते श्री.हसुराम शंभा भोईर तसेच नवघरचे सुपुत्र कस्टमचे वरिष्ठ अधिकारी श्री.महेंद्र जयराम भोईर तर कलामंचाच्या महिला गायिका कलाकारांचे सौ.हर्षला हसुराम भोईर आणि सौ.धनश्री हरेश्वर भोईर यांनी पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन सन्मान केला यावेळी दैनिक बाळकडू उरणच्या रणरागिणी तृप्तीताई भोईर,जेष्ठ नागरिक एकनाथ म्हात्रे,नवघर गावातील हनुमान प्रा.भजन मंडळाचे मॅनेजर प्रदिप म्हात्रे,कामगार नेते सुधीरभाई घरत रघुनाथ तांडेल समाधान तांडेल,दिनेश भोईर,प्रदिप भोईर,नरेश भोईर,ज्ञानेश्वर भोईर,भालचंद्र भोईर,विश्वनाथ भोईर,हसुराम तांडेल,राजाराम तांडेल,सुरेश भोईर,विजय भोईर,भगवान भोईर चेतन भोईर,हर्दिक भोईर यांच्या सहित प्रतिष्ठीत नागरिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते !!*