उंदर खेल गावच्या शेतकऱ्याची नात झाली सीए
उत्कर्षा मोरे हिचे सीए परीक्षेत सुयश
अंभोरा (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील उंदर खेल गावचे प्रगतिशील शेतकरी श्री संभू हिराजी मोरे यांची नात कुमारी उत्कर्षा मोरे ही चार्टर्ड अकाउट ची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . वडील श्री संतराम मोरे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुर या शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात आष्टी तालुक्यातील डोंगराळ भागात असलेले उंदरखेल गाव हे तसे शिक्षणाची गैर सोय असे असलेले गाव आहे पण उत्कर्षा ही लहानपणापासूनच शाळेत हुशार होती आजी-आजोबा माळकरी वारकरी संप्रदायातील असल्यामुळे आणि वडील शिक्षक असल्यामुळे तिच्यावर चांगले संस्कार झाले आणि आपणही चांगले शिक्षण घेऊन मोठे बनावे अशी तिची इच्छा होती पण गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे तिला शिक्षणासाठी मामा संतोष गाडे यांच्याकडे राहुन शिक्षण पुर्ण केले..इयत्ता दहावी मध्ये 93 टक्के गुण मिळवून शाळेत दुसरा क्रमांक आला इयत्ता बारावी मध्ये नगर जिल्ह्यातून मुली मध्ये पहिली येण्याचा मान तिला मिळाला गणित विषयाची आवड असल्यामुळे सी. ए करण्याचे ठरविले आणि ती आज सीए ची अंतिम परीक्षा पास झाली आहे उंदरखेल गावातील सर्व ग्रामस्थांनी तिचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले आणि तिचा सत्कार करण्यात आला
उंदरखेल गावचे सरपंच अंकुश वामन उपसरपंच डॉक्टर रमेश शेकडे तसेच माजी सभापती राजेंद्र दहातोंडे माजी सरपंच हरिभाऊ दहातोंडे माजी सरपंच राजेंद्र दहातोंडे आजिनाथ दहातोंडे आशोक दहातोंडे सर नितीन वामन शरद वामन पैलवान योगेश वामन दत्ता दहातोंडे भगवान चव्हाण मारुती मोरे गणेश मोरे बाबासाहेब मोरे .यांनी अभिनंदन केले आहे.