- पनवेल विभागातील दैनिक बाळकडू पत्रकार टीम तर्फे रिक्षा चालकांना ध्वज वाटप
देशाचा 75 वा अमृत महोत्सव सोहळा घरोघरी साजरा होत असताना हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत संतोष आमले यांच्या मार्गदर्शना खाली पनवेल विभागातील बाळकडू पत्रकार टीम चा वतीने महिला रिक्षा चालक व रिक्षाचालकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशाचे माजी सैनिक श्री. समीर दूंद्रेकर यांच्या उपस्थितीत समस्त रिक्षा चालकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी दैनिक बाळकडू कोकण उपविभाग प्रमुख श्री .संतोष आमले ,पत्रकार श्री.सुरेश भोईर,श्री.धनाजी पुदले,मच्छिन्द्र पाटील, श्री.गोरक्षनाथ झोडगे. श्री.राजपाल शेगोकर,श्री.कैलास रक्ताटे,सौ.शहीन शेख ,सौ. सावित्रा शेटे,सौ.पूनम शिवशरन् ,सौ.शीतल पाटील,सौ.अशा घालमे आदी उपस्थित होते.