स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पावसाळी अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न
पनवेल दि. २९ :
स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी व स्वाभिमानी युथ यांचे एक दिवसीय राज्यस्तरीय पावसाळी अधिवेशन चेंबूर येथील महाराणा हॉटेलमध्ये संपन्न झाले. या अधिवेशनाला राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे उपस्थीत होते. यावेळी मनोज संसारे यांचे पुत्र अनिकेत संसारे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते स्वाभिमानी युथच्या निवड करण्यात आली.
या अधिवेशनाला रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे व रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थीत होते. मनोज संसारे यांचे पुत्र अनिकेत संसारे ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील व प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्याला न्याय देतील तसेच पक्षाची वाढ जोमाने करतील असे मनोगत महेश साळुंखे यांनी व्यक्त केले.आगामी निवडणूकांमध्ये समविचारी पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे पक्षाचे उमेदवार महानगरपालीका, जिल्हापरिषद पंचायत समित्या, नगरपालीका व स्थानीक स्वराज्य संस्थामध्ये उभे करण्यात येणार आहेत. महेश साळुंखे यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबददल अनिकेत संसारे यांचे अभिनंदन केले.
फोटो – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पावसाळी अधिवेशन