शिवाजी जाधव , दामोपंत गव्हाणे,गोरक्षनाथ भवर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
संतोष आमले
पनवेल प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील शाळेमध्ये उत्कृष्ट काम करणा-या विविध शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा पुरस्कार दिला जातो यंदाचा आदर्श मुख्याध्यापक केंद्रिय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंभोरा केंद्रीय मुख्याध्यापक शिवाजी जाधव सुलेमान देवळा येथील माध्यमिक शाळेतील दामोपंत गव्हाणे , गोरक्षनाथ भवर प्राथमिक शाळा केळ यांना जाहीर झाला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंभोरा येथे गेल्या चार वर्षांपासून शिवाजी जाधव हे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून काम पाहात आहेत लोकसहभाग व शालेय अनुदानातून शाळेचा चेहरामोहरा त्यांनी शिक्षकांच्या मदतीने बदलला असून शाळेची गुणवत्ता ही त्यांनी शिक्षकांच्या सहकार्याने वाढविलीआहे .
दामोपंत गव्हाणे हे आदर्श शिक्षक गेल्या पाच वर्षापासून माध्यमिक शाळा सुलेमान देवळा या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे शाळेमध्ये वृक्षारोपण क्षेत्रभेटी सांस्कृतिक कार्यक्रम असे एक ना अनेक उपक्रम ते शाळेमध्ये राबवत असतात .गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी सुलेमान देवळा माध्यमिक शाळेमध्ये ते विद्यार्थी हितासाठी परिश्रम घेत आहेत .
गोरक्षनाथ भवर हे शिक्षक गेल्या पाच वर्षांपासून प्राथमिक शाळा केळ याठिकाणी कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मोलाचं कार्य केलं आहे .कोरोना नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी खूप मोलाचं कार्य केले
गोरक्षनाथ भवर सर प्रवचनाने कीर्तनामधून समाजप्रबोधनाचं सुद्धा कार्य करत आहे .अनेक ठिकाणी त्यांनी प्रवचनाने कीर्तनामधून लोकजागृती करण्याचा सामाजिक काम त्यांनी केले आहे
.उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्रीय मुख्याध्यापक शिवाजी जाधव सहशिक्षक दामोपंत गव्हाणे गोरक्षनाथ भवर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.