मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी विराजमान गणरायाचे युवासेनेचे राष्ट्रीय सहसचिव रुपेश पाटील यांनी घेतले दर्शन
पनवेल दि.१० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे युवासेनेचे राष्ट्रीय सहसचिव रुपेश पाटील यांनी नुकतेच दर्शन घेतले.
ह्या वर्षी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा’ निवासस्थानी नेते व आमदारांसोबत पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा प्रवेश मिळत होता. यंदाचा गणेशोत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्बंधमुक्त करून मंडळांना सहकार्य म्हणून तातडीने प्रशासनला आदेश देण्यात दिले. तसेच यंदा कमीत कमी एनओसी घेऊन मंडळांना परवानगी दिल्या गेल्याने युवासेनेचे राष्ट्रीय सहसचिव रुपेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व सामान्य जनतेच्या वतीने आभार मानले आहे.
फोटो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रुपेश पाटील यांनी घेतले गणेशाचे दर्शन