- *केंद्र सरकार पुरस्कृत स्वच्छ विद्यालय पुरस्कार-2022 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारोडीला*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारोडी या शाळेला या वर्षीचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार मा.जिल्हाधिकारी बीड, श्री. राधाबिनोद शर्मा, मा.शिक्षणाधिकारी प्रा.जि.प.बीड मा.श्री.श्रीकांत कुलकर्णी, मा.उप शिक्षण अधिकारी श्री.अजय बहीर, डायटचे मा.प्राचार्य श्री.विक्रम सारूक , आष्टीचे गटशिक्षणाधिकारी आ. श्री सुधाकरजी यादव साहेब यांच्या शुभहस्ते पुरस्कार चे वितरण करण्यात आले. प्रा शा पारोडीचे मुख्याध्यापक डॉ. सतीश सायंबर व सहशिक्षक श्री विठ्ठल दादा)शिंदे सर, यांना गौरवचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन गशिअ पाटोदा तथा नोडल अधिकारी श्री. शेळके साहेब, श्री.तुकाराम पवार, श्री.राऊत साहेब ,मोमीन ईसहाक सर यांनी केले व तळेकर सर यांनी सूत्रसंचालन केले.
शाळेमध्ये उपलब्ध असलेले हॅन्डवॉश स्टेशन , स्वच्छ शौचालय शौचालय, नळाद्वारे 24 तास पाणीपुरवठा , कचऱ्याची योग्य विल्हेवाट ,वृक्षारोपण रंगरंगोटी ,परिसर स्वच्छता
विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता. या सर्व बाबीचे ऑनलाईन परीक्षण होऊन त्यामधून फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त झालेल्या पारोडी च्या शाळेची निवड करण्यात आली. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक डॉ.सतीश सायंबर सहशिक्षक श्री.शिंदे सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री परमेश्वर सायंबर उपाध्यक्ष गोकुळ परकाळे सरपंच श्री भानुदास सायंबर उपसरपंच श्री.प्रकाशजी परकाळे , बालवाडी ताई, अंगणवाडी ताई
तसेच सर्व ग्रामस्थांचे माननीय जिल्हाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.