पनवेल परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले मोहटादेवी(रेणुका माता )मंदिर मध्ये नवरात्र उत्सव जल्लोषात
पनवेल दि, २७ (संजय कदम) : पनवेल सह नवीन पनवेल व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले व अनेकांच्या अडी- अडचणी दूर करणारी माता म्हणून प्रसिद्ध असलेली
नवीन पनवेल येथील मोहटादेवी(रेणुका माता )मंदिर मध्ये यंदाही भक्तगण मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा करीत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोहटा देवीचे प्रसिध्द असे देवस्थान आहे .महाराष्ट्रभर मोहटादेवीचा भक्तगण आहे.प्रत्येक नवरात्र व इतर दिवशी मोहटा देवी्च्या दर्शनासाठी मोहटा गाव या ठिकाणी जाणे शक्य होत नाही . पनवेल, मुंबई या ठिकाणाच्या भाविक भक्तांना देवीचे दर्शन पनवेल याठिकाणी घेता यावे या उद्देशाने मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करुन लोकसहभातुन नवीन पनवेल सेक्टर सात याठिकाणी 12 वर्षा पूर्वी मोहटा देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे ठीकाण सुध्दा अल्पावधीत जाग्रुत देवस्थान म्हणुन प्रसिध्द झाले आहे. नवीन पनवेल येथील सेक्टर ७ मध्ये मोहोटादेवी मंदिराचे जागृत देवस्थान असून मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून भक्ती भावाने नऊ दिवस देवीची पूजा केली जाते. नवी मुंबई पनवेल शहरामध्ये नगर बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या असल्याने नवीन पनवेल येथे देवीच्या मंदिरात नऊ दिवसाचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने केला जातो. नऊ दिवस रोज सायंकाळी आरती केली जाते.त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम पूजा अर्चा महाप्रसाद संप्पन होतो यानिमित्ताने अनेक भक्तगण मोहटा देवीला नवस बोलतात तर कित्येकजण बोललेले नवस फेडण्यासाठी आवर्जून सहकुटुंब उपस्थित राहत असल्याची माहिती मोहटा देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष शिवदास आमले यांनी दिली.