भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केला पुष्पहार अर्पण
पनवेल, दि.5 ः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे दर्शन घेवून त्यांना पुष्पहार अर्पण केला.
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांचा सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, पनवेल तालुकाध्यक्ष राहुल कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी, बौद्धाचार्य, श्रामणेर व बौद्ध धर्मीय कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी मार्गदर्शन सुद्धा केले.
फोटो ः धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचा करण्यात आला विशेष सत्कार