प्रबुध्द सामाजिक संस्थेच्या व नवतरुण मित्र मंडळ संयुक्त माध्यमातून धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा
पनवेल दि.०७ : प्रबुध्द सामाजिक संस्थेच्या व नवतरुण मित्र मंडळ संयुक्त माध्यमातून धम्मचक्र परिवर्तन दिवस करंजाडे बौध्दवाडा बुध्दविहार येथे साजरा करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ सचिव आयु. कुणाल लोंढे, करंजाडे ग्रामपंचायत सरपंच रामेश्वर आंग्रे, नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष अंकुश जाधव, अमित मोहिते, दिलीप लोंढे. प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष बापूसो साबळे, सचिव अमित कांबळे, खजिनदार सुशांत गायकवाड, रोहन खेडेकर, अमित यादव, सल्लागार बाळासाहेब वाघमारे, गौतम अहिरे, एन टी. सांवत, कमलाकर कांबळे (गुरुजी), अरुण कांबळे, महादेव कांबळे, संपादाताई चव्हाण, वर्षा गायकवाड, नितीशा निमसरकार, स्वाती ताकसांडे, प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व नवतरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी, भिमाई महिला मंडळ, प्रबुद्ध महिला मंडळ करंजाडेचे धम्मबांधव व धम्मभगिनी उपस्थित होते.
फोटो : प्रबुध्द सामाजिक संस्थेच्या व नवतरुण मित्र मंडळ संयुक्त माध्यमातून धम्मचक्र परिवर्तन दिवस साजरा