- रायगड जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेच्या पहिल्या शाखेचे नवीन पनवेल येथे छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल /प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशक छत्रपती संभाजी राजे यांच्या स्वराज्य संघटनेची गाव तिथे शाखा संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेची पहिल्या शाखेचे नवीन पनवेल तुलसी हाइट समोर सेक्टर 5 या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच पनवेल विभागात अनेक ठिकाणी विनोद साबळे साहेब आणि गणेश कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शाखेचेही उद्घाटन करण्यात आले यावेळी नवीन पनवेल शहर प्रमुख पदी श्री शरद मारुती घुले, नवीन पनवेल उपशहर प्रमुख पदी श्री चंद्रकांत रामदास शिंदे, सचिव संगम काशिराम पवार, प्रसिद्धी प्रमुख श्री संतोष आमले,खजिनदार संतोष जगताप,सहसचिव ऋषिकेश शिंगोटे या सर्वांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब पाटील,शिवसेना नेते किरण तावदरे शेकाप कामगार नेते प्रकाश म्हात्रे शेकाप युवा नेते बबन विश्वकर्मा संतोषी मोरे, मच्छिंद्र पाटील, सचिन तांबे, सुरेश भोईर, विजय धुंदरेकर, राजपाल शेगोकार, कैलास रक्ताटे, बाळा झोडगे, पूजा शेटे पदमा रक्ताटे व जगदंब मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व सामाजिक संघटना,राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवर उपस्थित होते