सोहम फाऊंडेशनच्यावतीने बालविवाह मुक्त भारत अभियान
पनवेल,दि.17- बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात काल वडघर ता.पनवेल येथे सोहम फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली. पनवेल आणि रायगड जिल्हयातील ग्रामीण भागात सोहम फाऊंडेशनच्यावतीने जनजागृती अभियान राबविले जात आहे. नवी दिल्ली येथील चिल्ड्रन फाऊंडेशन आणि महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट, पेण यांच्या सहकार्याने रायगड जिल्हयात अभियान सुरु आहे. बालविवाह राज्यात कमी व्हावेत, यासाठी हे अभियान राबविले जात आहे.
सोहम फाऊंडेशनच्यावतीने अध्यक्षा मंजिरी मुळे, सचिव ॲङ आश्लेषा मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र संयोजक शितल म्हात्रे काम पाहत आहेत. या अभियानाला ग्रामीण भागातून मोठया प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
————-