रेझिंग डे च्या निमित्ताने रिक्षा चालकांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन
पनवेल /प्रतिनिधी : (मच्छिंद्र पाटील )
रेझिंग डे च्या निमित्ताने वाहतूक शाखा अंतर्गत कळंबोली शाखेचे वरिष्ठ अधिकारी. निशिकांत विश्वकार साहेब. तसेच पी एस आय साठे साहेब. व पीएसआय साळुंखे साहेब. या अधिकाऱ्यांनी रेझिंग डे च्या निमित्ताने रिक्षा चालकांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन केले.
गणवेश परिधान करणे. मोबाईल वर न बोलणे. रिक्षा स्टँडवर रिक्षा अस्त व्यस्त उभ्या करणे. नागरिकांशी सौजन्याने वागणे. फ्रंट सीट न बसवणे.
ॲम्बुलन्स ला रस्ता मोकळा करून देणे. या सर्व सूचना कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ अधिकारी निशिकांत विश्वकर साहेब.यांनी रिक्षा चालकांना दिल्या.रिक्षा चालक हा एक समाजाचा घटक आहे. तो नेहमी नियमांचा पालन करून.आपली रोजी रोटी भागवत असतो. असे साहेब तिथे उपस्थित असलेल्या रिक्षा चालकांना म्हणाले.
तेथील उपस्थित रिक्षा चालकांनी रेझिंग डे च्या निमित्ताने. तिथे उपस्थित वरिष्ठ अधिकारी निशिकांत विश्वकर साहेब. पीएसआय साठे साहेब. पीएसआय साळुंखे साहेब. व तेथील उपस्थित पोलीस बांधव. व भगिनींना. रेझिंग डे च्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. व आम्ही सर्व सूचनांचा काळजीपूर्वक पालन करू असे आश्वासन उपस्थित रिक्षा चालकांनी.तेथील अधिकाऱ्यांना दिला.
सर्व रिक्षा चालकांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले.