कळंबोली वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम, दुचाकीस्वारांना हेल्मेटचे केले वाटप.
कळंबोली दि. १५ (वार्ताहर): कळंबोली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी स्वरांना केले रस्ता सुरक्षा हेल्मेटचे वाटप. कळंबोली वाहतूक शाखा ही नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून काल दुचाकी स्वरांना केले हेल्मेटचे वाटप. आपण पाहतो की जेव्हा दुचाकीचा अपघात होतो तेव्हा बहुतेक विना हेल्मेट दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच सर्वच दुचाकी सवार हेल्मेट खरेदी करण्याच्या परिस्थितीत नसतात, आधीच पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वजणच हेल्मेट खरेदी करू शकत नाहीत; हाच उद्देश कळंबोली वाहतूक शाखेच्या लक्षात आला व तेथील सर्व कर्मचारी वर्गाने निर्णय घेतला की गरजु नागरिकांना रस्ता सुरक्षा हेल्मेटचे वाटप करावे.
म्हणून दि.१४ रोजी कळंबोली वाहतूक शाखेचे कर्मचारी PI विश्वकर, PSI साठे PSI साळुंखे व कळंबोली वाहतूक शाखेतील सर्व कर्मचारी यांनी स्वतः जातीने हेल्मेट चे वाटप केले.
या अभिनव उपक्रमावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.