माजी उपमहापौर भाई जगदीश गायकवाड यांच्याकडून महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांचा सत्कार
पनवेल / प्रतिनिधी
माजी उपमहापौर जगदीशभाई गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानी नुकतेच महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष केवल महाडिक यांचा शाल व तुळशीचे रोप देऊन सत्कार केला. केवल महाडिक हे पत्रकारिता क्षेत्रातील एक ज्वलंत आक्रमक नेतृत्व असून कोणालाही न घाबरता पत्रकारिता व समाजसेवा ते करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना ते प्रिय आहेत. आजकाल डॅशिंग पत्रकारिता ही लोप पावत असून घाबरून व काहींच्या मर्जीने वृत्त छापण्याची वृत्ती उदयास आलेली आहे मात्र केवल महाडिक हे त्यास अपवाद असून त्यांच्यासारख्या डॅशिंग पत्रकारांमुळे आज पत्रकारिता टिकून आहे असे मत भाई जगदीश गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील, सहसचिव शैलेश चव्हाण, संतोष आमले अनुराग वाघचौरे, रहीस शेख आदी उपस्थित होते.