मा. नगरसेवक नितीनभाई पाटील यांच्याहस्ते श्रीफळ फोडून महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या श्री क्षेत्र शिर्डी-शनी शिंगणापूर -रांजणगाव-एकविरा कार्ला दौऱ्याला सुरुवात.
पनवेल / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे जेष्ठ सल्लागार दिपक महाडिक यांच्या मार्गदर्शनानुसार व तरुण तडफदार अध्यक्ष केवल महाडिक यांच्या नेतृत्वात दिनांक 16 फेब्रुवारी 2023 ते 17 फेब्रुवारी 2023 दरम्यान मोफत शिर्डी -शनी शिंगणापूर -रांजणगाव-आई एकविरा कार्ला दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर नवेदित तरुण पत्रकारांना एकत्रित करून त्यांना संघटित करण्याचे काम महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे केले जाणार असून अध्यक्ष केवल महाडिक यांनी या कार्याची सुरुवात साईंच्या दर्शनाने करावी असा संकल्प केला त्यानुसार आज दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी पनवेल महापालिकेचे मा. नगरसेवक नितीनभाई पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून व बसला हार घालून दौऱ्याची सुरुवात केली.
पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या सहलीला सुरुवात झाली असून याप्रसंगी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी, डॉ. श्रेयस ठाकुर,प्रसाद खंदारे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या दिनदर्शिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले.