महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टतर्फे आयोजित महिला क्रिकेट स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद
ब्लु ब्लास्टर प्रथम क्रमांकाचे मानकरी, लीगल एन्जल्स वाशी द्वितीय क्रमांक तर पनवेल वूमन्स ऍडव्होकेट टीम B तृतीय क्रमांकाचे मानकरी
पनवेल / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स टर्फ ग्राउंड येथे महिलांसाठी झाशीची राणी चषक 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला पोलीस -डॉक्टर -पत्रकार -वकील-शिक्षिका-सुरक्षा रक्षक मंडळ व अन्य क्षेत्रातील महिला यांच्यासाठी अंडर आर्म क्रिकेट सामने खेळवण्यात आले.
या क्रिकेट सामान्यांमध्ये एकूण 13 टीम ने सहभाग घेतला होता. प्रत्येक खेळणाऱ्या संघास संघटनेतर्फे टी-शर्ट देण्यात आले होते. यावेळी ब्लु ब्लास्टर बेलापूर कोर्ट ऍडव्होकेटस व लीगल एंजल्स वाशी यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात ब्लु ब्लास्टर बेलापूर कोर्ट ऍडव्होकेटस या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर लीगल एंजल्स वाशी यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले तर पनवेल वूमन्स ऍडव्होकेट क्रिकेट टीम B तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्या संघाना अभिनेत्री वर्षा पडवळ व सिनेअभिनेते सचिन पाडळकर यांच्याहस्ते भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या क्रिकेट सामन्यांना पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, औरंगाबादचे भाई संघर्ष सोनावणे, पुणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संतोष तोंडे, सार्थक टाइम्सचे कार्यकारी संपादक राहुल बोर्डे, माजी नगरसेविका सुरेखा मोहोकर, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, हरविंदर कौर हॅप्पी सिंग, महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे सल्लागार दिपक महाडिक, अध्यक्ष केवल महाडिक, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव संतोष सुतार, सहसचिव शैलेश चव्हाण, कार्याध्यक्ष संतोष भगत, नवी मुंबई अध्यक्ष नितीन जोशी, खालापूर तालुकाध्यक्ष निलेश घाग, खजिनदार सोनल नलावडे, प्रसिद्धीप्रमुख शितल पाटील, सदस्य संतोष आमले, मनोहर पाटील, प्रगती दांडेकर, मच्छिन्द्र पाटील, राजपाल शेगोकार, सुरेश भोईर, जगदीश क्षीरसागर, रहीस शेख, युनूस शेख, ऍड. मनोहर सचदेव, विशाल सावंत, असीम शेख, विद्यासागर ठाकूर, विजय दूंदरेकर, सुरेश भोईर, शाहीन शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.