राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन.
पनवेल प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने मुंबई विभागासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन भारती विद्यापीठ तंत्रनिकेतन, नवी मुंबई येथे दि. ३१, मार्च, २०२३ रोजी करण्यात आले.
सदर स्पर्धेचे उदघाटन रिलायन्स इंडस्ट्रीजचे उप अध्यक्ष महेश गंभीर यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईचे सचिव मा.डॉ.महेंद्र चितलांगे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, मुंबईचे संचालक डॉ.विलासराव कदम यांनी केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी.एन. टंडन ह्यांनी प्रास्ताविक केले.
नवी मुंबई विभागातून एकुण ४० तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे एक लाख आणि द्वितीय क्रमांकाचे ५० हजार रुपयाचे पारितोषिक अनुक्रमे पिल्लेज तंत्रनिकेतन रसायनी व विद्यालंकार तंत्रनिकेतन वडाळा आणि शासकीय तंत्रनिकेतन ठाणे यांच्यात विभागून देण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी सिडकोचे माजी मुख्य अभियंता श्री. केशव वर्डेकर हे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उप प्राचार्य श्री जे.के. पाटील सर यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी श्री. संतोष कदम सर यांना महाविद्यालयातील त्यांच्या सहकाऱ्यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.