जनतेचे सेवक म्हणून काम करा – मा. आमदार व जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर खानावळे ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मोहनशेठ लबडे यांनी स्वीकारला पदभार
पनवेल दि. २३ (वार्ताहर) : जनतेचे सेवक म्हणून काम करा, तुम्हाला जनतेचे भरभरून प्रेम मिळेल असे मार्गदर्शन मा. आमदार व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी मोहनशेठ लबडे यांच्या पनवेल तालुक्यातील खानावळे ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदभार समारंभ प्रसंगी केले. उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोहनशेठ लबडे यांनी प्रभारी सरपंचपदाचा पदभार स्विकारला.
या पदभार समारंभ कार्यक्रमास पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, हभप महादेव महाराज मांडे, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, संपर्कप्रमुख सुधीर पाटील,जिल्हा परिषद संपर्कप्रमुख अनंता पाटील, माजी उपसभापती देविदास पाटील ,माजी पंचायत समिती सदस्य वसंत काठावळे, मराठा समाजाचे उत्तम भोईर, ग्रामविकास अधिकारी श्री तारेकर, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यापुढे बोलताना मनोहर भोईर म्हणाले, उरणमधील सच्चा शिवसैनिक कुठेही शिंदे गटात गेला नाही. माझा नागरिक माझा ,कार्यकर्ता आहे या भावनेतून प्रामाणिकपणे काम करा. मोहनशेठ लबडे हे उपसरपंच असताना सुद्धा त्यांनी गावासाठी अनेक विकासाची कामे केली आहेत. सरपंचपदाची जी संधी मिळाली आहे आपल्या कार्यातून त्याचं सोनं करा.गावाचा विकास करा असे आवाहन त्यांनी केले. पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील यांनी मोहनशेठ लबडे हे अतिशय चांगले काम करत आहेत, आता त्यांच्यावर सरपंचपदाची मोठी जबाबदारी आलेली आहे.मला विश्वास वाटतो यापुढे विकासाची कामे होतील. आपली ग्रामपंचायत सक्षम असली तरी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात असे त्यांनी सांगितले. प्रभारी सरपंचपदी मोहनशेठ लबडे यांनी पदभार घेतल्यानंतर राजकीय, उद्योजक ,शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
फोटो : पदभार स्वीकारताना मोहनशेठ लबडे सोबत मा आमदार मनोहरशेठ भोईर