मृगनयनी माने तरुणीचा वेगळा आदर्श वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमात केले गरजू वस्तूचे वाटप
पनवेल प्रतिनिधी
सध्याच्या तरुण पिढीमध्ये मोज मजा करण्याची फिरण्याची आवडत जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते बऱ्याच प्रमाणात तरुण तरुणी व्यसनाच्या अधीन गेलेले पाहिला मिळत आहे, मोठ्या किमतीचे कपडे महागडा मोबाईल या कडे तरुण तरुणीचे आकर्षण आहे, आई वडील सुद्धा मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. परंतु सध्याची तरुण पिढी वेगळ्या वळणावर जाताना दिसून येत आहे. आत्ताच्या पिढीतील तरुण-तरुणां आदर्श निर्माण होईल असे. मृगनयनी विनोद माने या तरुणीने दाखून दिले आहे स्वतःच्या खर्चातून काटकसर करत पैसे वाचवले आहे. आपल्या गरजांना मर्यादित ठेवून खर्च केला त्यातून पैसे वाचवत वाढदिवस मित्रा-मैत्रिणीमध्ये न साजरा करता. वायफळ खर्च न करता. नवीन पनवेल येथील वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना लागणाऱ्या गरजू वस्तूंचे वाटप करून वाढदिवस साजरा केला. आपल्या कुटुंबासोबत आश्रम मधील वृद्धांच्या सहवासात वेळ घालवत तरुण-तरुणा पुढे एक वेगळा आदर्श घडवला आहे. आई-वडिलांनी घालून दिलेला आदर्श शिक्षणासाठी घेतलेले कष्ट मुलीसाठी पाहिलेले स्वप्न या मुळे मी मनाशी ठरवले होते कि वेगळा काहीतरी करायला हवं असे मत मृगनयनी विनोद माने व्यक्त केले. या केलेल्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.कारेक्रम दरम्यान वडील विनोद सदाशिव माने, आई स्वाती विनोद माने, बहीण निशा माने, आयुष्य माने सह कुटंब सदस्य उपस्थित होते