किशोर देवधेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पनवेल जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
महाराष्ट्र प्रतिनिधी / संतोष आमले
पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यामध्ये प्रशांत पाटील यांच्या हस्ते क्षेपामुळे पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी वाढली. याची मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सौ.सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या कडे स्वतः भेटुन पत्र दिले.परंतु पक्ष श्रेष्ठींनी याकडे दुर्लक्ष केले. २४ वर्षं पक्षनिष्ठा ठेवून जर यांना पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल घ्यायची नसेल. व लाचारांनाच संधी मिळणार असेल तर कार्यकर्त्यांनी का पक्षनिष्ठा दाखवावी.
तसेच पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये निष्क्रिय सतिश पाटील याने राष्ट्रवादी पक्षावर अविश्वास दाखवून पक्ष सोडून गेला होता. अजितदादा पवार गटात ह्याला काडीचीही किंमत मिळाली नाही म्हणून पुन्हा शरद पवार गटात आला.व पक्ष क्षेष्टींनी हया निष्क्रिय माणसाला पुन्हा जिल्हाध्यक्ष बनवले.त्यानंतर पुन्हा पक्षात गटबाजी सुरू झाली. तसेच प्रशांत पाटील यांच्या पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हस्तक्षेपामुळे मी माझ्या २४ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रिय क्रियाशील कार्यकर्ता व पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या हातात दिला.