पनवेल महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत सरकारी व खाजगी शाळेतील पाचवी ते आठवी इयत्तामधील शाळा होणार सुरू
वार्ताहर/प्रतिनिधी:पनवेल महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत सरकारी व खाजगी शाळेतील पाचवी ते आठवी इयत्तामधील शाळा सुरू होत आहेत.मागील १० महिन्यांपासून आपण सर्व कोरोना काळात भयानक अश्या मानसिक व आर्थिक संकटाला सामोरे गेलो आहोत. अनेकांच्या रोजंदारीवर व नोकरीवर परिणाम झालेला आहे.जानेवारी महिन्याच्या अखेरीस म्हणजे फेब्रुवारी मार्च व एप्रिल या तीन महिन्यासाठी आपल्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सरकारी नियमानुसार सुरू राहणार आहेत.
शाळेचा गणवेश हा विद्यार्थ्यांसाठी तसेच शाळेसाठी गौरवाचा व अभिमानाचा विषय असतो. शाळेच्या नियमात हे बंधनकारक आहे; परंतु या २०२०-२१ शैक्षणिक वर्षांत सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना गणवेशासाठी सक्ती करू नये. जेणेकरून पालकांना अधिक आर्थिक फटका बसणार नाही. तरी आपण सर्व शाळांना आदेश देऊन या शैक्षणिक वर्षांसाठी गणवेश सक्ती न करण्याच्या सूचना द्याव्यात.
या आशयाचे निवेदन २५ जानेवारी २०२१ रोजी मेलद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार, पनवेल महानगरपालिका शिक्षणाधिकारी,आमदार प्रशांत ठाकूर,महापौर डॉ.कविता चौतमल यांना खारघर-तळोजा मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केले आहे.