बॅंक एटीएममधून लबाडीने केली रोखरक्कम लंपास
पनवेल दि.30 (संजय कदम): एटीएममध्ये पैसे काढत असताना सदर व्यक्तीचे लक्ष विचलीत करून हातचलाखीने त्याच्याकडील एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड बदलून ते स्वतःकडे घेऊन स्वतःच्या फायद्याकरीता स्वतःकडे ठेवून त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करून सदर इसमाच्या खात्यातील जवळपास 36 हजार लबाडीने काढल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
प्रविण चोरघे (वय-38) हे एसबीआय बँक पनवेल येथे पैसे काढत असताना त्यांचे लक्ष विचलीत करून दोन अनोळखी इसमांनी हातचलाखीने त्याच्याकडील एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड बदलून ते स्वतःकडे घेऊन स्वतःच्या फायद्याकरीता स्वतःकडे ठेवून त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करून सदर इसमाच्या खात्यातील जवळपास 36 हजार लबाडीने काढल्याची घटना घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.