नकली सोने देऊन तीन अनोळखी इसमांनी केली चार लाख एकोणचाळीस हजारांची फसवणूक
पनवेल दि २०: तीन अनोळखी इसमांनी त्यांच्याकडे असलेल्या पिवळ्या धातूंच्या मण्यांच्या माळा या सोन्याच्या आहेत असे सांगून एका इसमाची जवळपास चार लाख एकोणचाळीस हजारांची फसवणूक केल्याची घटना पनवेल रेल्वे स्टेशन च्या बाहेर असलेल्या एनएमएनटी बसस्थानकाजवळ घडली आहे.
राकेश पार्टे (वय ३६) यांना दोन अनोळखी इसम व एक महिला या तिघांनी मिळून त्यांच्याकडे पिवळ्या धातूंच्या मण्यांच्या माळा या सोन्याच्या आहेत असे सांगून त्याच्या बदल्यात तुम्ही रोख रक्कम द्या असे सांगून त्यांच्या कडून ३,९५,०००/- रुपये घेऊन तसेच ठरलेली रक्कम हि कमी पडत असल्याने राकेश पार्टे यांनी त्यांच्या पत्नीची सोन्याची चैन व दोन अंगठ्या असा मिळून जवळपास चार लाख एकोणचाळीस हजार रुपये दिले. व त्याबदल्यात त्या अनोळख्या व्यक्ती नि त्यांना नकली सोन्याच्या माळा देऊन ते पसार झाले आपली फसवणूक झाल्याचे राकेश पार्टे यांच्या लक्षात येताच त्यांनी या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.