कोरोना संकटात आधीच त्रस्त असलेल्या पोलिस कर्मचारी बंधू भगिनींच्या बदल्या करू नयेत- राजे प्रतिष्ठान कामगार सेनेची पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे मागणी. पनवेल / प्रतिनिधी : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यामध्ये होणाऱ्या नवी मुंबई पोलिसांच्या बदल्या रखडल्या होत्या गृहविभागाच्या आदेशाने या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती पदभार घेतल्यानंतर नवीन पोलीस आयुक्त कुमार सिंह यांच्या आदेशानुसार नुकत्याच 514 पोलीस कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचार्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. आता पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक आदींचा बदलांची प्रतीक्षा लागले असून या बदल्या सुद्धा लवकरच होणार असल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई पोलीस दलात पाच हजारांपेक्षा जास्त मनुष्यबळ आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रशासकीय बदल करण्यात येतात दरवर्षी मे महिन्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केलेली असते मात्र याला कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आलेला होता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या होत्या. नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्तांनी बदल्यांच्या रखडलेले काम काम मार्गी लावले आहेत त्यानुसार नवी मुंबई पोलिस कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे पोलीस शिपाई पोलीस नाईक पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांचा या बदलांमुळे समावेश आहेत आधीच कोरोनामुळे अनेक पोलिस बांधव आहेत रस्ता असून त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे तसेच राहत्या घराच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी बदली केल्याने त्यांची दगदग होऊन इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कोरोना काळामध्ये नव्याने बदली झालेल्या ठिकाणी घर मिळणे, मुलांचे शिक्षण करणे व समाजात मिसळणे या गोष्टी लवकर शक्य होणार नाहीत त्यामुळे याचा त्रास संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिवाराला होऊ शकतो. कोरोनामध्ये नोकरी करून काही पोलिसांचा जीव गेलेला आहे त्यामुळे तूर्तास तरी पोलीस कर्मचारी बंधू भगिनींच्या बदल्या आपण राज्याचे पोलीस महासंचालक या नात्याने व माणुसकीचा आदर ठेवत रद्द कराव्यात अशी मागणी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलिस महासंचालक कडे पत्राद्वारे केली आहे.