तळोजा येथील देवीचापाडा येथे मंदिरात चोरी
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील तळोजा येथील देवीचापाडा गावात असलेल्या गावदेवी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे 50 हजाराची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
सदर मंदिराचा मुख्य दरवाजा बाहेरुन बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाला असलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला व मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील जवळपास 50 हजाराची रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
