कारंजाडे येथून इसम बेपत्ता
पनवेल दि. 25(वार्ताहर) राहत्या घरामध्ये कुणालाही काहीही न सांगता 52 वर्षीय इसम कोठेतरी निघून गेल्याने ते हरवल्या ची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सुखदेव जयवंतराव ढिलपे (वय 52) राहणार करंजाडे, रंग सावळा, चेहरा गोल, डोक्याचे केस सफेद, छातीवर मधोमध जुन्या माराची निशाणी आहे. अंगाने सडपातळ, उंची 5 फूट 6 इंच असून अंगात निळ्या रंगाची फुल पॅन्ट व जांभळ्या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट घातला आहे. या इसमाबाबत कुणाला माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दूरध्वनी 02227452333 किंवा पोलीस नाईक व्ही.बी.गावडे यांच्याशी संपर्क साधावा.