विचुंबेतील शेकडो भाजप कार्यकर्ते शिवसेनेत
पनवेल दि.25 (वार्ताहर) थोर महापुरुष शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त पनवेल ग्रामीण येथील विचुंबे गावातील शेकडो बिजेपीच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत आणि पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
त्यावेळी उपस्थित पनवेल विधानसभा समन्वयक प्रदिप ठाकूर, उपमहानगरप्रमुख दिपक घरत, शहरप्रमुख रुपेश ठोंबरे, उपशहरप्रमुख अतुल मोकळ, विभाग प्रमुख बिपीन झुरे, शाखाप्रमुख रोहन गायकवाड, जयेश पाटील, रवी पाटील, सुकेश भोपी, महिला आघाडीच्या विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, तालुका संघटिका मेघा दमडे, महानगर संघटिका शुभांगी शेलार, उपशहर संघटिका मंदा जंगले, उपशहर संघटिका संचिता राणे, आस्मा खान आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते तसेच विचुंबे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.