अल्पवयिन मुलास फुस लावून पळवून नेण्यात आले
पनवेल दि.29 (वार्ताहर)- करंजाडे गायकर वाडा येथे राहणारा 13 वर्षीय अल्पवयिन मुलास कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात कऱण्यात आली आहे. कृष्णा विलास मासोळकर असे या मुलाचे नाव असून रंग गोरा, अंगाने सडपातळ, उंची 5 फूट, चेहरा गोल, डोळे काळे, नाक फुगीर, डोक्यास काळ्या रंगाचे बारीक केस, गुडघ्यावर जुन्या जखमांच्या खुणा, डाव्या हातावर इंग्रजीत के गोंदलेले असून अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा फूल बाह्यांचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स. तसेच पायात निळ्या रंगाची पट्टी असलेली प्लॅस्टिक चप्पल घातलेली आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-27452333 किंवा सहा पोलिस निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधावा.